यशोगाथा
ग्रामपंचायत :- कोळगाव ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर योजना :- ‘क. वर्ग तीर्थक्षेत्र विकास करणे. कामाचे नाव :- १)श्री कोळाईदेवी देवस्थान सुशोभिकरण करणे.कामाचे वर्ष :- २०२२-२३मंजूर निधी :- १)१० लक्ष २)१० लक्ष कोळगाव हे गाव अहिल्यानगर दौंड रस्त्यावर आहे.श्री कोळाई देवी देवस्थान हे कोळगाव फाट्या कडे जाणा-या रस्त्याच्या उजव्या बाजूला गावापासून ५०० मीटर अंतरावर आहे.गावाअंतर्गत भापकरवाडी,वेठेकरवाडी, पांढरेवाडी, लगडवाडी हे महसुली गावं आहेत. गाव व वाड्यांचे हे देवस्थान मुख्य दैवत आहे.सदरील देवस्थानचे तीर्थक्षेत्र विकास करणे योजने अंतर्गत सन – २०२२-२३ (१)परिसर सुशोभिकरण करणे हे काम (२) पथदिवे बसविणे ३)रस्ता कॉंक्रीटीकरण असे कामे झाल्याने भाविकांना/ग्रामस्थांना सुविधा निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायत :- कोळगाव ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर कामाचे नाव :- मौजे कोळगाव येथे दशक्रियाविधी ठिकाण सुशोभीकरण करणे..कामाचे वर्ष :- २०२३-२४ कोळगाव हे गाव अहिल्यानगर दौंड रस्त्यावर आहे.कोळगावचेदशक्रिया विधी ठिकाण कोळगाव गावात बाबांच्या मठाच्या शेजारी आहे. सन -२०२४-२५मध्ये मौजेकोळगाव येथे दशक्रिया विधी ठिकाण सुशोभिकरण करणे.हे काम पूर्ण झाले आहे.सदर काम झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातारवण निर्माण झाले आहे.सदर स्मशानभूमी सुशोभीकरणाचे काम झाल्याने ग्रामस्थांना बसण्याची सोय झाली.पूर्वी पावसाळ्यामध्ये चिखल होत असल्याने दशक्रियाविधीसाठी ग्रामस्थांची गैर सोय होत होती. सदर काम झाल्याने दशक्रियाविधी ग्रामस्थांची सोय झालेली आहे. दशक्रियाविधीसाठी ग्रामपंचायत मार्फत गरम पाण्यासाठी सोलार योजना बसविणेत आलेली असून गरम व गार पाणी तसेच दशक्रीयाविधी ठिकाणी बसण्यासाठी चटई व प्रवचनासाठी स्पीकर सिस्टीम ठेवल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे.
ग्रामपंचायत :- कोळगाव ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर योजना :- नागरिक सुविधा योजना कामाचे नाव :- मौजे कोळगाव येथील गावांतर्गत कुंभारगल्ली येथील संत गोरोबा काका चौकात पेव्हिंग ब्लॉक बसविणे...कामाचे वर्ष :- २०२३-२४मंजूर निधी :- १० लक्ष कोळगाव हे गाव अहिल्यानगर दौंड रस्त्यावर आहे. नागरी सुविधा विशेष अनुदान योजना सन-२०२३-२४ अंतर्गत मौजे कोळगाव येथे कुंभारगल्ली मधील संत गोरोबाकाका चौकात पेव्हिंग ब्लॉक बसविणे.हे काम १० लक्ष रकमेचे झाल्यामुळे ग्रामस्थामध्ये आनदांचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर काम झाल्यामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी खुप सोय झाली आहे.सदर रस्त्यामुळे नागरिकांचे रस्त्याची अडचण दूर झाली आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये व मुलांमध्ये आनंदाचे वातारवण निर्माण झाले आहे.त्यामुळे ग्रामपंचायत कोळगाव व ग्रामस्थांच्या वतीने जि.प.अहिल्यानगर यांचे मन:पूर्वक धन्यवाद !
ग्रामपंचायत :- कोळगाव ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर योजना :- लोकवर्गणी कामाचे नाव :- मौजे कोळगाव येथील ग्रामस्थांसाठी लोकवर्गणीतून रुग्णवाहिका खरेदी करणेकामाचे वर्ष :- २०२४-२५मंजूर निधी :- लोकवर्गणी कोळगाव हे गाव अहिल्यानगर दौंड रस्त्यावर आहे. लोकवर्गणीअंतर्गत मौजे कोळगाव येथे ग्रामस्थांसाठी रुग्णवाहिका खरेदी करणेत आलेली आहे. त्यामुळे गोरगरीब ग्रामस्थांना कमी वेळेत व अत्यल्प खर्चात दवाखान्यात जाण्यासाठी रुग्णवाहिकेची सोय झालेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कोळगाव चे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानन्यात आले !
लोकवर्गणीतून गावच्या नागरिकांसाठी रुग्णवाहिका खरेदी
ग्रामपंचायत :- कोळगाव ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगरयोजना :- १५वा वित्त आयोग कामाचे नाव :- मौजे कोळगाव येथील ग्रामस्थांसाठी १५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीचे मंगल कार्यालय दुरुस्ती करून सोयी सुविधा उपलब्ध करून देणे. कामाचे वर्ष :- २०२४-२५मंजूर निधी :- १५ वा वित्त आयोग ग्रा.प.स्तर कोळगाव हे गाव अहिल्यानगर दौंड रस्त्यावर आहे. १५ वा वित्त आयोग निधी ग्रामपंचायत स्तर अंतर्गत मौजे कोळगाव येथील सैनिक सांस्कृतिक भवन मंगल कार्यालय ग्रामस्थांसाठी दुरुस्ती करणेत आलेली आहे. तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे गोरगरीब ग्रामस्थांना फक्त ११०००/- रुपयात आपल्या मुलामुलींचे लग्न कार्य करणे शक्य झाले आहे. सदर कार्यालयात ग्रामस्थांना ग्रामपंचायत मार्फत ४ कुलर तसेच जेवणासाठी ८० टेबल व ५५० खुर्ची ची सोय करण्यात आल्यामुळे त्यामुळे ग्रामस्थामध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कोळगाव चे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानन्यात आले !
ग्रामपंचायत :- कोळगाव ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर योजना :- नागरिक सुविधा योजना कामाचे नाव :- मौजे कोळगाव येथील सैनिक सांस्कृतिक भवन कडे जाणारा रस्ता कॉंक्रीटीकरण करणे..कामाचे वर्ष :- २०२३-२४मंजूर निधी :- १० लक्ष कोळगाव हे गाव अहिल्यानगर दौंड रस्त्यावर आहे. नागरी सुविधा विशेष अनुदान योजना सन-२०२३-२४ अंतर्गत मौजे कोळगाव येथे सैनिक सांस्कृतिक भवन कडे जाणारा रस्ता कॉंक्रीटीकरण करणे हे काम झाल्यामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी खुप सोय झाली आहे.सदर रस्त्यामुळे नागरिकांचे रस्त्याची अडचण दूर झाली आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये व मुलांमध्ये आनंदाचे वातारवण निर्माण झाले आहे.त्यामुळे ग्रामपंचायत कोळगाव व ग्रामस्थांच्या वतीने जि.प.अहिल्यानगर यांचे मन:पूर्वक धन्यवाद !